🕒 1 min read
गेल्या काही आठवड्यांपासून आशियात पुन्हा एकदा COVID-19 चं संकट उभं राहत आहे. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडसारख्या देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील 257 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांनाही दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर एक नवा JN.1 व्हेरिएंट, जो ओमिक्रॉनशी संबंधित आहे, तो देखील चिंतेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत पारंपरिक लसीकरणामुळे महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र आता शास्त्रज्ञ नाकावाटे दिली जाणाऱ्या लसीवर भर देत आहेत.
Nasal Vaccine May Be More Effective Against COVID-19, Say Scientists
Yale University च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की, नाकातून दिली जाणारी ‘नेझल व्हॅक्सीन’ ही कोरोनावर अधिक प्रभावी ठरू शकते. कारण कोरोनाचा संसर्ग मुख्यत्वे नाक आणि घशातून होतो. अशावेळी या मार्गावरच लस दिल्यास सुरुवातीपासूनच विषाणूला अडथळा निर्माण करता येतो.
येल स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रा. अकिको इवासाकी यांच्या मते, “नाकात दिल्या जाणाऱ्या स्प्रेमध्ये असलेले विशिष्ट प्रोटीन विषाणूंविरोधात स्थानिक प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. ही पद्धत सुरक्षित आणि अधिक प्रभावी ठरू शकते.”
शास्त्रज्ञांनी यासाठी उंदरांवर प्रयोग केला. सुरुवातीला इंजेक्शनने पारंपरिक लस देण्यात आली आणि त्यानंतर नाकातून बूस्टर डोस दिला गेला. यामध्ये नेझल लसीने अधिक प्रभावी कामगिरी केल्याचं आढळलं. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाकाद्वारे लसीकरण हा कोरोनाविरुद्ध लढ्यातील एक नवा आशेचा किरण ठरत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “बँक असो वा ऑफिस… कास्टिंग काऊच सगळीकडेच आहे!” अभिनेत्रीचं खळबळजनक मत
- MI सामना अजून बाकी आहे, पण दिल्लीला आधीच मोठा धक्का! केएल राहुलच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी
- धोनीसमोर वाकला 14 वर्षांचा खेळाडू! वैभव सूर्यवंशीच्या कृतीने संपूर्ण भारताचं मन जिंकलं – पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





