Share

धोनीसमोर वाकला 14 वर्षांचा खेळाडू! वैभव सूर्यवंशीच्या कृतीने संपूर्ण भारताचं मन जिंकलं – पाहा व्हिडीओ

14-year-old Vaibhav Suryawanshi touched MS Dhoni’s feet after RR’s win over CSK in IPL 2025. His gesture went viral and won hearts across India. Watch the emotional moment!

Published On: 

14-year-old Vaibhav Suryawanshi touched MS Dhoni’s feet after RR’s win over CSK in IPL 2025. His gesture went viral and won hearts across India. Watch the emotional moment!

🕒 1 min read

IPL 2025 च्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर दमदार विजय मिळवत हंगामाचा शेवट गोड केला. या सामन्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं 14 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने. त्याने केवळ अप्रतिम 57 धावांची खेळी केलीच, पण सामन्यानंतर केलेल्या एका भावनिक कृतीमुळे त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.

सामन्यानंतर हस्तांदोलनाच्या वेळी वैभव थेट महेंद्रसिंह धोनीच्या पाया पडला आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेतला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून वैभवच्या नम्रतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. धोनीनेही प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवत संवाद साधला.

Vaibhav Suryawanshi Wins Hearts by Touching MS Dhoni’s Feet After CSK vs RR Match

या घटनेबाबत वैभवने नंतर प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटलं, “धोनी सर हे अनेकांचं आदर्श आहेत. मी त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. ते माझ्याहून वरिष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना आदर देणं हे माझं कर्तव्य आहे.”

या सामन्यात राजस्थानने 188 धावांचं लक्ष्य 17.1 षटकांतच गाठलं. वैभवसह संजू सॅमसनने 41, यशस्वी जयस्वालने 36 आणि ध्रुव जुरेलने नाबाद 31 धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

खेळ बातम्या राष्ट्रीय बातम्या
Batmi.in