🕒 1 min read
‘वॉर 2’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. विशेषत: बिकिनी लूकमुळे ती सध्या चर्चेत आहे. मात्र या लूकवर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी करत नवा वाद ओढवून घेतला आहे.
राम गोपाल वर्मा याने एक्स (ट्विटर) वर कियाराचा फोटो शेअर करत एक आक्षेपार्ह कॅप्शन लिहिलं. त्यामध्ये त्याने हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांना देखील ओढत अत्यंत अश्लील मजकूर पोस्ट केला. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
Ram Gopal Varma Trolled for Vulgar Comment on Kiara Advani Bikini Look
“मनाची घाण साफ कर,” “अशा व्यक्तीला ट्विटरवर बॅन करायला हवं,” “या वयात अशी कमेंट? लाज वाटली पाहिजे,” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर वर्मावर टीका करण्यात आली. ट्रोलिंग वाढल्यानंतर अखेर वर्माने ती पोस्ट हटवली, पण त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.
‘वॉर 2’ हा अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट ऑगस्ट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा अडवाणीसोबत हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. ‘वॉर’ या चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MI vs DC सामना पावसामुळे रद्द झाला तर कोण बाहेर आणि कोण प्लेऑफमध्ये? आकड्यांची सगळी गणितं इथे वाचा!
- “तू फालतू, तू घाणेरडी!” – वैष्णवीच्या कथित ऑडिओ क्लिपनं केला धक्कादायक खुलासा, शशांकचं नाव चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





