Share

“तू फालतू, तू घाणेरडी!” – वैष्णवीच्या कथित ऑडिओ क्लिपनं केला धक्कादायक खुलासा, शशांकचं नाव चर्चेत

A shocking audio clip allegedly from Vaishnavi Hagwane has surfaced, revealing details of harassment, mental trauma, and intentions to seek divorce before her death in Pune.

Published On: 

A shocking audio clip allegedly from Vaishnavi Hagwane has surfaced, revealing details of harassment, mental trauma, and intentions to seek divorce before her death in Pune.

🕒 1 min read

पुणे | पिंपरीतील 23 वर्षांच्या वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच आता तिची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये ती शशांक आणि तिच्या नातलगांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख करताना ऐकायला मिळते.

Vaishnavi Hagwane Death: Leaked Audio Clip

“तू फालतू, तू घाणेरडी आहेस”

या व्हायरल क्लिपमध्ये वैष्णवी म्हणते की, “लग्न करून मी चूक केली. ताईने माझी बदनामी केली, सगळ्यांना माझ्याबद्दल सांगते. शशांकसोबतही मी लॉयल नव्हते, असं म्हणाली.” या क्लिपमधून तिच्या घरातील तणावपूर्ण संबंध उघड होत आहेत.

“मी घटस्फोट देणार आहे”

या क्लिपमध्ये वैष्णवी सांगते की, “माझा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मला मारहाण केली जात होती. दाजींनाही खरं वाटत होतं. म्हणून मी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.”

“मी चूक केली…”

वैष्णवीचा संताप आणि वेदना या क्लिपमधून व्यक्त होत असून, ती म्हणते, “मी विरोध करून हे लग्न केलं आणि तीच माझी मोठी चूक होती.”

मृत्यू की हत्या?

16 मे 2025 रोजी वैष्णवीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं असलं तरी, तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे की तिचा खून करण्यात आला आहे. पती शशांक, सासू-सासरे आणि नणंद यांच्यावर हुंडाबळी आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, महागडं मोबाईल इ. दिलं गेलं होतं, तरीही तिला त्रास दिला गेला, असा आरोप आहे.

📌 टीप: वरील ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्ररित्या पडताळलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

गुन्हे पुणे (Pune News) महाराष्ट्र राजकारण
Batmi.in