🕒 1 min read
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने विविध देशांमध्ये भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिष्टमंडळामार्फत जागतिक स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र, या संकल्पनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.
राऊत म्हणाले की, “ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, अशा ठिकाणी खासदारांचं शिष्टमंडळ का पाठवलं जातंय? हे शिष्टमंडळ म्हणजे टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी वाटतेय.” त्यांनी केंद्र सरकारवर थेट टीका करत विचारलं की, चीन, तुर्कस्थान, नेपाळ यासारख्या शेजारी राष्ट्रांमध्ये शिष्टमंडळ का नाही पाठवलं?
Sanjay Raut Slams Centre’s Foreign Delegation as ‘Tours & Travels’ After Operation Sindoor
ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश असून, पक्षाने संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. मात्र, राऊतांनी शिष्टमंडळाच्या यादीसंदर्भात पक्षप्रमुखांशी पूर्वचर्चा न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी यावर उदाहरण देताना तृणमूल काँग्रेस पक्षाच्या युसूफ पठाणला परस्पर समाविष्ट करण्यात आल्यावर ममता बॅनर्जी यांनी हरकत घेतल्याचंही सांगितलं.
राऊत म्हणाले की, “जर सरकारने प्रत्येक पक्षाच्या अनुभवी खासदारांची नावे मागितली असती, तर आम्ही पूर्ण सहकार्य केले असते. पण ही निवड एकतर्फीपणे झाली आहे, जी योग्य नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- कियाराच्या बिकिनी फोटोवर दिग्दर्शकाची घाणेरडी कमेंट; ट्रोलर्सनी चांगलाच घेतला समाचार!
- MI vs DC सामना पावसामुळे रद्द झाला तर कोण बाहेर आणि कोण प्लेऑफमध्ये? आकड्यांची सगळी गणितं इथे वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





