🕒 1 min read
हिंदी चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊच हा विषय नेहमीच चर्चेचा ठरतो. अनेक अभिनेत्रींनी या प्रकरणावर आपले अनुभव मांडले आहेत. आता ‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनू अग्रवाल हिनेही या संवेदनशील मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एका अलीकडील मुलाखतीत अनू अग्रवाल म्हणाली, “माझ्यासोबत कधी कास्टिंग काऊच घडला नाही. पण हा प्रकार आज सर्वत्र आहे. आपण फक्त फिल्म इंडस्ट्रीवर बोट का ठेवतो? बँकेत नाही का कास्टिंग काऊच? कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नाही का?”
Anu Aggarwal Speaks on Casting Couch
पुढे बोलताना ती म्हणाली, “पुरुष आणि महिला हे जगाच्या उत्पत्तीपासूनच एकत्र आहेत. त्यांच्यातील आकर्षण, संबंध हे नैसर्गिक आहेत. म्हणूनच या गोष्टी कोणत्याही क्षेत्रात टाळता येत नाहीत. मग एवढा गोंधळ का?” अनू अग्रवालने हे वक्तव्य करत कास्टिंग काऊचबाबत समाजाच्या दुटप्पी वागणुकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, अनूने ‘आशिकी’नंतर ‘गजब तमाशा’, ‘राम शास्त्र’ आणि ‘किंग अंकल’ सारख्या सिनेमांत काम केलं. मात्र 1998 मध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर तिने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकला होता.
सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम सक्रीय असते. चाहत्यांशी संपर्क ठेवण्यासाठी ती सातत्याने स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
📌 महत्वाच्या बातम्या
- MI सामना अजून बाकी आहे, पण दिल्लीला आधीच मोठा धक्का! केएल राहुलच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी
- धोनीसमोर वाकला 14 वर्षांचा खेळाडू! वैभव सूर्यवंशीच्या कृतीने संपूर्ण भारताचं मन जिंकलं – पाहा व्हिडीओ
- गुजरातचा लखनौविरुद्ध सामना केवळ औपचारिक नाही, ‘टॉप 2’ चं स्वप्न धोक्यात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





