🕒 1 min read
बल्गेरियन भविष्यवेत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी 2025 साली जगात घडणाऱ्या गंभीर संकटाविषयी एक मोठं भाकीत केलं होतं. त्यांच्या समर्थकांच्या मते, त्यांनी भविष्यवाणी केली होती की 2025 मध्ये भूकंप, युद्धं आणि महापुरांच्या मालिकेमुळे जगाच्या अंताची सुरुवात होईल.
1911 मध्ये बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांना लहानपणी वादळात दृष्टी गमवावी लागली होती. त्यानंतर त्यांना ‘दिव्य दृष्टी’ प्राप्त झाली आणि त्यांनी अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल अचूक भविष्यवाणी केल्याचा दावा त्यांच्या भक्तांकडून केला जातो.
Baba Vanga 2025 Prediction
वेंगांच्या एका भविष्यवाणीनुसार, 2025 च्या अखेरीस जगावर एक गंभीर संकट येणार आहे. तथापि, त्या संकटाचं स्वरूप काय असेल याबाबत त्यांनी स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे ही आपत्ती नक्की कशाप्रकारची असेल – नैसर्गिक की मानवनिर्मित, यावर चर्चा सुरू आहे.
वेंगांच्या मते, 2025 मध्ये जगभरात अनेक मोठे भूकंप, महापूर आणि युद्धं सुरू होतील. वर्षाच्या सुरुवातीलाच काही देशांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि वाढलेलं आंतरराष्ट्रीय तणाव पाहता, त्यांच्या या भाकीताने पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधलं आहे.
📌 डिस्क्लेमर: वरील माहिती विविध सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित असून तिच्या सत्यतेबद्दल कोणताही दावा करण्यात येत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तोपर्यंत महाविकास आघाडी आहे” – सपकाळांची स्पष्ट भूमिका
- पाकिस्तानने दिली शस्त्रसंधीची अंतिम मुदत; भारत-पाक युद्धाचा धोका वाढतो?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





