गुजरातचा लखनौविरुद्ध सामना केवळ औपचारिक नाही, ‘टॉप 2’ चं स्वप्न धोक्यात!

GT needs a win against LSG to secure a Top 2 finish in IPL 2025. Despite qualifying for playoffs, a loss here could let RCB or PBKS overtake them based on NRR. A crucial match awaits!

Published On: 

IPL 2025 च्या 64व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. लखनौचा प्लेऑफचा प्रवास संपला असला तरी आत्मगौरवासाठी ते विजयासाठी खेळणार आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्सने आधीच प्लेऑफसाठी पात्रता मिळवली असून, आता त्यांचा उद्देश ‘टॉप 2’ स्थान सुरक्षित करणे हा आहे.

गुजरातने आतापर्यंत 12 पैकी 9 सामने जिंकले असून 18 गुणांसह ते गुणतालिकेत आघाडीवर आहेत. मात्र, टॉप 2 स्थान निश्चित करण्यासाठी लखनौविरुद्ध विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जर गुजरातने हा सामना गमावला आणि पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांनी त्यांच्या उर्वरित सामन्यांत विजय मिळवला, तर ‘नेट रन रेट’च्या गणितावर टॉप 2 स्थान धोक्यात येऊ शकते.

GT vs LSG: Gujarat Titans Must Win to Secure IPL Top 2 Spot

प्लेऑफच्या टॉप 2 संघांना काय मिळतंय?

या स्थानावर असलेल्या संघांना दोन संधी मिळतात अंतिम फेरी गाठण्यासाठी. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पराभव जरी झाला तरी क्वॉलिफायर 2 मध्ये पुन्हा एकदा संधी मिळते. त्यामुळे सर्वच दिग्गज संघ ‘टॉप 2’ साठीच झगडत आहेत.

गुजरात विरुद्ध लखनौ – हेड टू हेड नोंदी:

या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 वेळा टक्कर झाली असून गुजरातने 4 वेळा बाजी मारली आहे. मात्र, लखनौने यंदाच्या हंगामात गुजरातचा 6 विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे लखनौविरुद्धचा सामना गुजरातसाठी सोपा ठरणार नाही हे निश्चित!

 महत्वाच्या बातम्या

विश्वसनीय आणि ताज्या मराठी बातम्यांसाठी Batmi.in - आपली विश्वासार्ह माहितीची जागा.

🕘 संबंधित बातम्या