Share

“तोपर्यंत महाविकास आघाडी आहे” – सपकाळांची स्पष्ट भूमिका

Congress president Harshvardhan Sapkal met Uddhav Thackeray to discuss Maharashtra’s future, democracy, and local elections. He said MVA still stands united.

Published On: 

Harshvardhan Sapkal met Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र धर्म, लोकशाही आणि निवडणुकीची रणनीती यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “महाविकास आघाडी आजही आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. स्थानिक निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकांची घोषणा झाल्यावर स्थानिक पातळीवर घेतला जाईल.”

Harshvardhan Sapkal met Uddhav Thackeray

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “भाजप धर्म आणि लोकशाही दोन्ही बुडवू पाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म जगवणं गरजेचं आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चांगली चर्चा झाली असून, पुढील वाटचालीसाठी आम्ही सज्ज आहोत.”

याशिवाय, सपकाळ यांनी लिहिलेलं राहुल गांधी यांच्यावरील पुस्तकही उद्धव ठाकरे यांना भेट दिलं. या भेटीमुळे महाविकास आघाडीतील समन्वय पुन्हा दृढ होण्याची चिन्हं असून, शरद पवार यांच्या गटाची पुढील भूमिका काय असेल, याकडेही आता सर्वांचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बातम्या राजकारण
Batmi.in